महिला व बालविकास विभागामार्फत अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ठरवले आहे की काही लाडक्या बहिणींना येणारे ₹1500 चे हप्ते आता बंद केले जाणार आहेत. चला ही सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू करण्यात आली होती. आता या योजनेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. जून महिन्यात येणारा हप्ता हा या योजनेचा 12वा हप्ता आहे, म्हणजेच एकूण बारा महिने पूर्ण होत आहेत.
पण काही महिलांना पुढे हप्ता मिळणार नाही. का तर त्याचे कारण आहे – त्या महिला सरकारी नोकरी करत आहेत. सरकारने पाहणी केल्यानंतर लक्षात आले की राज्यात 2289 महिला अशा आहेत ज्या सरकारी कर्मचारी असूनही या योजनेचा लाभ घेत होत्या.
लाडकी बहीण योजना ही गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे. पण सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांकडे आधीपासूनच स्थिर उत्पन्न आहे. त्यामुळे सरकारने ठरवलं आहे की अशा महिलांना या योजनेचा पुढील लाभ देण्यात येणार नाही.
अशा महिलांना आतापर्यंत सुमारे 3 कोटी 58 लाख रुपये या योजनेअंतर्गत दिले गेले होते. ही सगळी माहिती अदिती तटकरे यांनी लेखी स्वरूपात सुद्धा जाहीर केली आहे.
म्हणून जर एखादी महिला सरकारी नोकरी करत असेल, तरी तिने जर ही योजना घेतली असेल, तर आता तिला पुढचे हप्ते मिळणार नाहीत. ही योजना फक्त गरजू, बेरोजगार किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी आहे.