मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेत सरकार विवाहित, विधवा आणि घटस्फोटीत महिलांना दर महिन्याला ₹1500 मदत करते. आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते म्हणजे 12 वेळा पैसे दिले गेले आहेत.
आता जुलै महिन्याचा 13 वा हप्ता सुरू होणार आहे. ज्यांना 12 वा हप्ता मिळाला नाही, त्यांनाही आता या 13 व्या हप्त्यासोबत मागचे पैसे मिळतील. म्हणजेच त्यांच्या खात्यात ₹3000 जमा होतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की, ज्या महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना सरकारकडून 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळेल.
ही योजना फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे. पण काही अटी आहेत:
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा कमी असावे.
- घरात कोणी सरकारी नोकरीत असेल तर पैसे मिळणार नाहीत.
- महिलेकडे ट्रॅक्टर किंवा चार चाकी वाहन नसावे.
- बँक खाते आधार आणि मोबाईलशी जोडलेले असावे.
13 व्या हप्त्याची तारीख अजून निश्चित नाही, पण लवकरच पैसे बँकेत जमा होतील. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत करणे आणि स्वावलंबी बनवणे आहे.