गेल्या वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “माझी लाडकी बहिण” नावाची योजना सुरू केली. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून, महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. आजपर्यंत या योजनेचे 12 हप्ते म्हणजे 12 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. म्हणजेच या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 2025 या महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. जून 2025 चा हप्ता म्हणजे बारावा हप्ता 30 जून रोजी जमा होण्यास सुरुवात झाली. या हप्त्यासाठी सरकारने 3600 कोटी रुपये मंजूर केले होते.
आता जुलै 2025 चा हप्ता कधी मिळणार याची लोक वाट पाहत आहेत. मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाला होता. पण जूनचा हप्ता जुलैमध्ये मिळाला. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की जुलैचा हप्ता कधी येणार? काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं जातं की जुलैचा हप्ता याच महिन्यात, तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिळेल.
जर हे खरं ठरलं, तर लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा मिळेल. आता महिलांना जूनचे पैसे मिळाले आहेत की नाही, हे तपासण्याची माहिती खाली दिली आहे.
1500 रुपये खात्यात जमा झालेत का, हे कसं तपासायचं?
तुमच्या खात्यात पैसे आलेत का, हे चेक करण्यासाठी दोन मार्ग आहेत – ऑनलाईन आणि ऑफलाईन.
ऑनलाईन पद्धत:
- बँकेचं अधिकृत मोबाईल अॅप उघडा आणि बॅलन्स चेक करा.
- PhonePe, Google Pay किंवा इतर UPI अॅपवरून देखील खात्यातील पैसे बघू शकता.
- काही बँका मिस्ड कॉलची सुविधा देतात. दिलेल्या नंबरवर मिस कॉल दिल्यास तुमचा बॅलन्स मेसेजमध्ये येतो.
ऑफलाईन पद्धत:
- जवळच्या बँकेत जा.
- तिथे पासबुक प्रिंट करून घ्या.
- पासबुकमध्ये ‘लाडकी बहीण योजना’चा हप्ता जमा झालाय की नाही, ते बघा.
या सोप्या पद्धती वापरून तुम्ही खात्यात पैसे आलेत की नाही हे सहज चेक करू शकता.