लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! ₹1500 हप्ता मिळणार नाही या महिलांना – तुमचं नाव आहे का?

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत काही महिलांना आता हप्ता मिळणार नाही. कारण सरकारने तपासणी करून त्या महिलांना अपात्र ठरवलं आहे. अजूनही काहींची तपासणी सुरू आहे. म्हणून तुम्ही पात्र आहात का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे.

हप्ता मिळवण्यासाठी काही नियम आहेत. महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे. जर उत्पन्न जास्त असेल, तर त्या घरातील महिलेला हप्ता मिळणार नाही.

जर घरातील कोणी आयकर भरत असेल किंवा ITR दाखल करत असेल, तर त्या घरातील महिलेलाही हप्ता मिळणार नाही. तसंच, जर कुणी सरकारी नोकरी करत असेल – राज्य सरकार, केंद्र सरकार, नगरपालिका, महामंडळ किंवा इतर सरकारी विभागात – तर त्या घरातील महिलेला ही योजना मिळणार नाही. निवृत्त झालेल्या आणि पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या घरातल्या महिलांनाही हप्ता मिळणार नाही.

काही अपवाद आहेत. जर घरात खासगी नोकरी करणारा असेल किंवा कंत्राटी कामगार असेल आणि त्याचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, तर त्या घरातील महिलेला हप्ता मिळू शकतो.

एक महत्त्वाचा नियम म्हणजे, जर कोणत्याही महिलेला इतर सरकारी योजनेतून दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल, तर तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत असतील तर लाडकी बहीण योजना मिळणार नाही. पण PM किसान योजनेतून फक्त 500 रुपये मिळत असल्यामुळे त्या महिलेला ही योजना मिळेल.

राजकीय पदावर असणाऱ्या लोकांच्या घरातील महिलांना सुद्धा हप्ता मिळणार नाही. म्हणजे खासदार, आमदार किंवा मंडळाचे अध्यक्ष असतील तर त्यांच्या घरातील महिलांना फायदा मिळणार नाही.

शेवटी एक अट अजून आहे – ज्या कुटुंबाकडे चारचाकी गाडी आहे, त्या घरातील महिलांना हप्ता मिळणार नाही. पण ट्रॅक्टर असल्यास हरकत नाही.

आता सरकार अपात्र महिलांचा हप्ता थांबवते आहे. जर कोणी नियम मोडून पैसे घेत असेल, तर त्यांचे पैसे कधीही बंद होऊ शकतात. त्यामुळे तुमचं नाव या नियमांमध्ये बसतं का ते नक्की तपासा.

Leave a Comment