PM किसानच्या २०व्या हप्त्याची तारीख जाहीर – तुमचं नाव यादीत आहे का?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेली एक खूप महत्त्वाची योजना आहे. या योजनेत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६,००० रुपये देते. हे पैसे तीन वेळा मिळतात आणि प्रत्येक वेळी २,००० रुपये दिले जातात. सध्या शेतकरी २०वा हप्ता कधी मिळेल याची वाट पाहत आहेत. कारण खरीप हंगाम सुरू झाला आहे आणि त्यासाठी बियाणं, खते, औषधं, मशागत यासाठी पैसे लागतात.

हा हप्ता जून २०२५ मध्ये बँक खात्यात जमा होईल असा अंदाज आहे. पण अजून सरकारकडून यावर काही अधिकृत माहिती आलेली नाही. असे मानले जात आहे की १५ जून २०२५ नंतर पैसे जमा होतील. कारण सध्या सरकार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यावर भर देत आहे.

सरकार नवीन शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्यासाठी काही मोहिमा राबवत आहे. यामुळे जास्त शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळेल. जे शेतकरी ३१ मे २०२५ पूर्वी ॲग्री स्टॅक नावाच्या वेबसाईटवर नोंदणी करून ठेवतील आणि ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असेल, त्यांनाच पुढचा हप्ता मिळेल.

काही शेतकऱ्यांनी अजूनही ही दोन्ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. म्हणूनच सरकारने १५ जून २०२५ पर्यंत त्यासाठी वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे पैसे १५ जूननंतरच येणार आहेत. ज्यांनी अजून नोंदणी किंवा ई-केवायसी केली नाही, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या CSC केंद्रात जाऊन किंवा ऑनलाईन जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी.

सरकारने ही प्रक्रिया त्यामुळे अनिवार्य केली आहे, जेणेकरून योग्य आणि खर्‍या शेतकऱ्यांनाच या योजनेचा फायदा मिळेल. ज्यांना योजनेचा फायदा मिळवायचा आहे त्यांनी सगळी माहिती बरोबर भरावी आणि वेळेत सगळं पूर्ण करावं. सरकारने कृषी अधिकारी आणि अन्य माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देत राहिलं आहे, जेणेकरून कोणाचाही हप्ता थांबू नये.

Leave a Comment