राज्य सरकारने मागच्या वर्षी शेतकऱ्यांसाठी फक्त 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. पण लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे पैसे कमी पडू लागले. त्यामुळे सरकारने जुनी योजना बंद केली आणि आता नवीन सुधारित पीक विमा योजना 2025 च्या खरीप हंगामासाठी सुरू केली आहे.
मागच्या वर्षी ज्यांनी अर्ज केला होता, त्यांचा विमा मंजूर झाला आहे. आणि आता सरकार त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करायला सुरुवात करत आहे. पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर सरकारकडून भरपाई मिळावी यासाठी यंदा सुद्धा पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणं खूप गरजेचं आहे.
या योजनेसाठी सरकारने नवीन नियम आणि सुरक्षेची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी आपल्या मोबाईलवरूनच 10 मिनिटांत अर्ज करू शकतात.
तुमच्या मोबाईलमध्ये Crop Insurance नावाचे अॅप डाऊनलोड करा. अॅप उघडल्यावर डॅशबोर्ड दिसेल. तिथे “Login” वर क्लिक करा. मागच्या वेळेस जो मोबाईल नंबर टाकला होता तोच नंबर द्या. त्यावर एक ओटीपी येईल, तो टाकून लॉगिन करा.
लॉगिन झाल्यावर “PMFBY Insurance” नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता अर्जाचा फॉर्म उघडेल. तिथे यंदाचा खरीप हंगाम, योजना (PMFBY), आणि चालू वर्ष निवडा. मग “Submit and Next” वर क्लिक करा.
तुम्हाला बँकेची माहिती बदलायची असेल, तर “Add New Account” वर क्लिक करा. नंतर “Save and Next” वर क्लिक केल्यावर तुमची माहिती आपोआप भरलेली असेल. नसेल तर स्वतःची माहिती भरावी लागेल.
पुढे शेताचा पत्ता भरायचा अर्ज येईल. सविस्तर पत्ता लिहा आणि “Proceed” वर क्लिक करा. मग पिकाची माहिती, पेरणीची तारीख, आणि शेतमालकाची माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर “Proceed” करा.
यानंतर तुम्ही किती एकरासाठी विमा भरायचा आहे, ते लिहा. त्यावरून विमा किती भरायचा हे दाखवले जाईल. “Proceed” वर क्लिक करा. त्यानंतर, पिकाचे नुकसान झाल्यास किती भरपाई मिळू शकते हे सुद्धा दाखवले जाईल. हवं असल्यास “Add More” वर क्लिक करून अजून पिकांसाठी अर्ज करू शकता.
सर्व माहिती भरल्यावर आता काही कागदपत्र अपलोड करावे लागतील. जसं की बँक पासबुकचा फोटो, सातबारा, 8 अ, आणि स्वयंघोषणापत्र. हे सगळं अपलोड करून शेवटी “Submit” बटनावर क्लिक करा.
तुमचा अर्ज सबमिट झाला की एक पॉलिसी नंबर मिळेल. त्यानंतर पुढे जाऊन विमा रक्कम भरावी लागेल.
पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. सध्या राज्यभर अर्ज सुरू आहेत. शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यामुळे उशीर न करता लगेच अर्ज करा. काही अडचण आली तर आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करून विचारू शकता. धन्यवाद.