PM किसान योजनेचा 20वा हप्ता कधी जमा होणार? सरकारनं जाहीर केली ‘ही’ तारीख!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवेळी ₹2000 ची मदत मिळते. या योजनेचा २०वा हप्ता कधी मिळणार, हे जाणून घेण्यासाठी शेतकरी खूप उत्सुक आहेत. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली. काही गावांमध्ये पेरण्या झाल्या, पण बऱ्याच ठिकाणी पेरण्या उशिरा सुरू झाल्या किंवा थांबल्या. काही ठिकाणी तर दुसऱ्यांदा पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. म्हणून ते या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पूर्वी असं वाटत होतं की जून महिन्याच्या शेवटी हा हप्ता खात्यात जमा होईल. पण अजूनही तो जमा झालेला नाही. आता बातमी अशी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै रोजी बिहारमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्या दिवशी पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता डिजिटल पद्धतीने दिला जाऊ शकतो, असं बोललं जातंय. पण सरकारने अजून याची पक्की घोषणा केलेली नाही.

आपलं नाव या योजनेत आहे की नाही, हे बघायचं असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:

  1. https://pmkisan.gov.in या वेबसाइटला जा.
  2. “Farmer Corner” वर क्लिक करा.
  3. “Beneficiary List” निवडा.
  4. तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
  5. “Get Data” वर क्लिक करा आणि माहिती तपासा.

जर तुमची ई-केवायसी पूर्ण झाली असेल आणि आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असेल, तर पैसे थेट खात्यात जमा होतील. काही अडचण आली, तर खाली दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन करा:

  • पीएम किसान हेल्पलाइन: 1800-115-5525
  • इतर नंबर: 155261 किंवा 011-24300606

केंद्र सरकारने एक महत्त्वाचा नियम ठरवला आहे – एका घरात फक्त एक व्यक्तीलाच या योजनेचा फायदा मिळेल. म्हणजे जर घरात आई, वडील, भाऊ, बहीण असे असतील, तरी फक्त एकालाच हप्ता मिळेल. हे सरकारनं ठरवलं आहे, जेणेकरून चुकीचे लोक लाभ घेणार नाहीत आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचतील.

तुमचा हप्ता आला का ते वेळोवेळी वेबसाईटवर बघत राहा. सगळी कागदपत्रं योग्य असतील, तर हप्ता वेळेवर खात्यात येईल.

Leave a Comment