तुम्ही गावात राहताय का? अजूनही तुमचं स्वतःचं पक्कं घर नाहीये का? आणि म्हणूनच तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये म्हणजेच PMAY-G मध्ये अर्ज केला होता का?
तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी 2025 जाहीर केली आहे. आता ही यादी तुम्ही घरबसल्या, तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर ऑनलाइन पाहू शकता. यातून तुम्ही सहज बघू शकता की तुमचं नाव यामध्ये आहे का.
ही यादी म्हणजे काय असते? तर ही एक सरकारी यादी असते, ज्यामध्ये अशा लोकांची नावे असतात ज्यांना घर बांधण्यासाठी सरकारकडून मदत मिळणार असते. ही योजना खास करून अशा लोकांसाठी आहे जे अजून पक्क्या घरात राहत नाहीत. सरकार दरवर्षी ही नवीन यादी बनवते आणि जाहीर करते.
तुमचं नाव आहे का ते बघायचं असेल, तर खाली दिलेल्या स्टेप्स लक्षपूर्वक वाचा:
- सर्वात आधी PMAY-G ची अधिकृत वेबसाइट ओपन करा.
- त्यानंतर AwaasSoft या पर्यायावर क्लिक करा.
- आता Reports हा पर्याय निवडा.
- तिथे H. Social Audit Reports मध्ये “Beneficiary details for verification” या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमचं राज्य, जिल्हा, वर्ष, तालुका, गाव यांची माहिती भरा.
- खाली दिसणारा कॅप्चा कोड टाका.
- नंतर Submit बटणावर क्लिक करा.
इतकं केल्यानंतर तुमच्यासमोर यादी ओपन होईल. त्यात तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. हवं असेल तर ही यादी PDF म्हणूनही डाउनलोड करू शकता.
तर मित्रांनो, जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचं नाव यादीत आहे का हे बघायचं असेल, तर या सोप्या पद्धतीनं लगेच चेक करा. तुमचं नाव असेल तर लवकरच सरकारकडून घर बांधण्यासाठी मदत मिळू शकते.