PM किसानचा 20वा हप्ता आला! लगेच तुमचं नाव यादीत आहे का ते तपासा!

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे – PM किसान योजनेचा २०वा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हा हप्ता मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

ही योजना केंद्र सरकारने २०१८ साली सुरू केली. या योजनेत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,००० आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम ₹२,००० चे तीन हप्ते करून थेट बँकेत जमा केली जाते.

१९वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मिळाला होता. त्यामुळे पुढील हप्ता २० जून २०२५ च्या आसपास मिळण्याची शक्यता आहे. थोडा उशीर होऊ शकतो, त्यामुळे अचूक तारीख जाणून घेण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाइट (https://pmkisan.gov.in) तपासा.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका.

हप्ता मिळण्यासाठी काय गरजेचं आहे?
✅ तुमचं नाव लाभार्थी यादीत असणं
E-KYC पूर्ण असणं आवश्यक
✅ आधार आणि बँक खाते लिंक असणं
✅ जमिनीचे कागदपत्र तयार ठेवावेत

जर अडचण असेल, तर बँकेत किंवा CSC केंद्रात मदत घ्या.

E-KYC कसं कराल?

  1. https://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या
  2. “E-KYC” वर क्लिक करा
  3. आधार नंबर टाका, OTP भरा
  4. सबमिट करा आणि KYC पूर्ण होईल
    जर हे ऑनलाइन जमत नसेल, तर CSC केंद्रात करा.

तुमचं नाव यादीत आहे का?

  1. वेबसाइटला जा: https://pmkisan.gov.in
  2. “Beneficiary List” वर क्लिक करा
  3. राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा
  4. “Get Report” वर क्लिक करा

या योजनेचे फायदे
🟢 वर्षाला ₹६,००० थेट खात्यात
🟢 दलालाशिवाय पैसे
🟢 ऑनलाइन प्रक्रिया
🟢 खरीप आणि रब्बीसाठी मदत

महत्त्वाच्या तारखा

  • हप्ता तारीख: अंदाजे २० जून २०२५
  • रक्कम: ₹२,०००
  • KYC शेवटची तारीख: ११ जून २०२५
  • नोंदणी डेडलाइन: ११ जून २०२५

महाराष्ट्रात ‘नमो शेतकरी योजना’ देखील आहे. यातही ₹६,००० मिळतात. म्हणजे दोन्ही मिळून ₹१२,००० थेट खात्यात.

जर तुमची कागदपत्रं आणि KYC पूर्ण असेल, तर लवकरच तुमच्या खात्यात PM किसान योजनेचा २०वा हप्ता येईल. वेळेत सगळं करा आणि हप्ता वेळेवर मिळवा!

Leave a Comment